Home महाराष्ट्र “…तर अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ...

“…तर अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही”

भंडारा : भविष्यात काँग्रेस बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशारा  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

मनमोहन सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही तसेच त्यांचे सिनेमे प्रदर्शितही होऊ देणार नाही, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पटोलेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण! अरूण राठोडला पोलिसांनी घेतलं ताब्यात

‘तू बोलतो किती? तुझी औकात किती?; अमोल मिटकरींची पडळकरांवर नाव न घेता टीका

“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन सतीश शर्मा यांचं निधन”

“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना कोरोनाची लागण”