करोनामुक्ती लढ्यातील परिचारिकांच्या सेवेची मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल- अजित पवार

0
147

मुंबई : करोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, प्रसंगी डॉक्टरांच्याही एक पाऊल पुढे जावून जोखीम पत्करुन रुग्णांची सेवासुश्रूषा करत आहेत. परिचारिकाच्या सेवाकार्याची नोंद मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक ‘परिचारिका’ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

मानवतेच्या कल्याणात रुग्णसेवेचं स्थान सर्वोच्च आहे. जगभरातल्या परिचारिकांनी त्यांच्या सेवाकार्यातून मानवतेची अखंड सेवा केली आहे. आज जगावर करोनाचं संकट असताना असंख्य परिचारिका देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत. उपचारांच्या बरोबरीनं रुग्णांना धीर, विश्वास, आत्मबळ देत आहेत. करोनाविरुद्धच्या लढाईत याच परिचारिकांची भूमिका मुख्य असून या लढाईत त्याच मुख्य सैनिक आहेत,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

करोनावर सध्यातरी कोणतेही हमखास औषध नसल्यानं रुग्णांची योग्य काळजी आणि शुश्रूषा हीच आरोग्य संजीवनी ठरत आहे. हे काम परिचारिका भगिनी अत्यंत सेवाभावानं, तन्मयतेने करत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांचं करोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत समस्त परिचारकांचं हे योगदान कोणीही विसरू शकणार नाही, असंही अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपला सोडचिठ्ठी देण्यावरुन एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा; म्हणाले..

काँग्रेसने सचिन सावंत यांना उमेदवारी द्यायला हवी होती; संजय राऊतांनी व्यक्त केली खंत

…पण हा माणूस फक्त स्वतःच्या पदासाठी फिरतोय; निलेश राणेंच उद्धव ठाकरेंवर टीकस्त्र

…म्हणून संजय राऊत यांनी मानले काँग्रेसच्या दोन नेत्यांचे आभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here