” राज्यात सुरु केलेल्या योजना भाजपच्या भल्याच्या नाही तर राज्याच्या भल्याच्या”

0
246

औरंगाबाद : नवीन सरकारने विकास कामांच्या योजना बंद करायला सुरुवात केल्या आहेत. त्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकार वर निशाणा साधला.

राज्यात सुरु केलेल्या योजना भाजपच्या भल्याच्या नसून राज्याच्या भल्याच्या होत्या. असं सुडाचं राजकारण करु नका, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. शिवसेना तत्त्व गुंडाळून सत्तेत आली आहे. आमचा पंगा शिवसेनेशी नाही. मात्र त्यांनी राष्ट्रवादीपासून सावध राहावं, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मतदारांनी आपल्या दोघांना मतदान दिल्याने इतक्या जागा मिळवणं शक्य झालं. हे शिवसेनेने लक्षात ठेवावं. राज्यातील विकास काम बंद केल्यावर लोक तुम्हाला काय पेढे देणार आहेत का?” असा सवालही पाटील यांनी केला आहे.

मराठा आणि कुणबी युवकांसाठी सुरु केलेली सारथी योजनांवर देखील सरकारने अनेक निर्बंध घातले. आतापर्यंत 500 जणांना या योजनेचा फायदा झाला आहे. हे सरकार राज्याच्या हिताचे काम करत नसल्याच दिसून येतं, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

रामदास आठवले मुर्ख आहेत, तळवे चाटूनच त्यांनी पदं मिळवलीत- आनंदराज आंबेडकर

निलेश राणे यांनी केली विनायक राऊतांवर आक्षेपार्ह पोस्ट

इंग्लंडच्या खेळाडूंनी केली पाकिस्तानची धुलाई; एकाच सामन्यात इंग्लंडच्या दोन फलंदाजांंची शतकी खेळी

“संधी मिळताच जनता पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवते”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here