आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबई ड्रग्स केस आणि आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिकांनी आरोपांची मालिकाच सुरु ठेवलीय. अशात प्रभाकर साईल या पंचाने केलेल्या लाचखोरीच्या आरोपावरुन समीर वानखेडे यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरु करण्यात आलीय. या प्रकरणावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय.
समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. एका अधिकाऱ्याची जात काढली जाते, त्याचा बायकोची इज्जत काढली जाते, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका केली.
हे ही वाचा : “नवज्योत सिंग सिद्धूंना काही कळत नाही, ते जास्त बोलतात, पण त्यांना मेंदू नाही”
महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे दाबण्यासाठीच समीर वानखेडे प्रकरणाची चर्चा सुरु आहे. गेली 12 दिवस झाले समीर वानखेडे दलित की मुस्लिम हा वाद सुरु आहे. अजित पवारांवर 11 दिवस धाडी सुरु होत्या. त्यांना वाचवण्यासाठीच हे प्रकरण सुरु करण्यात आलं. ही सगळी ठाकरे सरकारची बदमाशी सुरु आहे, असंही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
दरम्यान, शरद पवार यांनी स्पष्ट केलं की अजित पवारांकडे चिल्लर सापडली. पण बिल्डरकडे 180 कोटी सापडले, त्याच बिल्डरने अजित पवारांना 100 कोटी रुपये दिले आहेत. अजित पवारांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत. अजित पवार सिंचन घोटाळ्यात आरोपी आहेत. चार्जशीटमध्ये त्यांचं नाव आहे. त्यावरील कारवाई या सरकारने थांबवली आहे, आसा आरोपही किरीट सोमय्या यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
आदित्य ठाकरे म्हणाले काल इथं कुणी गाजर दाखवून गेलं; आता देवेंद्र फडणवीस म्हणतात…
महापालिकेत भाजपला शंभरपेक्षा अधिक जागा मिळणार; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा
“शिवसेनेचाच खासदार होणार आणि विजयी सभेला उद्धव ठाकरे येणार”