आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पिंपरी : आयकर विभागाने घातलेल्या धाडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 65 साखर कारखान्यांच्या विक्रीची यादी जाहीर केली होती. मात्र या यादीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. चंद्रकांत पाटील पिंपरी येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
जरंडेश्वरची चौकशी करा आणि उरलेल्या 64 कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करू नका, अशी आमची भूमिका कधीच नव्हती. उलट अजितदादांनी जाहीर केलेल्या सर्वच्या सर्व 65 साखर कारखान्यांची चौकशी करा हीच आधीपासूनची आमची मागणी आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : वसईत शिवसेनेला मोठे खिंडार; 150 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
जरंडेश्वर साखर कारखान्याचे प्रकरण काळा पैसा पांढरा करण्याचे आहे व त्याची चौकशी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी करत आहे. ऊर्वरित साखर कारखान्यांचे प्रकरणही मनी लाँडरिंगचे असेल तर त्याचीही चौकशी करावी. उपलब्ध माहितीनुसार इतर कारखान्यांची विक्री अत्यंत कमी भावात झाल्याची तक्रार आहे. त्याची चौकशी करताना त्या विक्रीमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या राज्य सहकारी बँकेची आणि त्या बँकेचे संचालक असलेल्या अजित पवार यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे., असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, या गैरव्यवहाराला मौन संमती देणाऱ्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांची आणि मदत करणाऱ्या नेत्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण
“विधानसभेत चांगला निकाल द्यायचाय, तुम्हांला जागे करायला आलोय”