देशातील भाजपची भगवी लाट ओसरण्यास सुरुवात झाली- शरद पवार

0
849

मुंबई : झारखंडमध्ये भाजपचा पराभव झाला. यावर देशातील भाजपची भगवी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे असं वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सत्ता व संपत्तीचा वापर करून राज्ये ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न झारखंड विधानसभा निवडणुकीत अपयशी ठरला, जनतेने भाजपला स्वीकारलं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

शरद पवार यांनी ट्विट करत झारखंड विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयाबद्दल झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राजद आघाडीचं अभिनंदन केलं.

दरम्यान, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडनंतर आता झारखंडमधूनही भाजपा हद्दपार झाला आहे, भाजपाला लागलेली ही उतरती कळा आता कोणीही थांबवू शकणार नाही, सोमवारीही शरद पवार यांनी झारखंडच्या निकालावरुन भाजपवर टीका केली होती.

महत्वाच्या घडामोडी-

-ही तुम्हाला असहिष्णुता वाटत नाही का? आशिष शेलारांचा शरद पवारांना सवाल

-स्मार्टफोन कंपनी Apple ‘हा’ APP प्ले स्टोअरमधून हटवला

-“जनतेला गृहीत धरंल की, वेगळं काय घडणार”

-‘या’ दिवशी होणार महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here