Home महाराष्ट्र कंगना रणौतप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेनं दादागिरी करु नये; रामदास आठवलेंचं आवाहन

कंगना रणौतप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेनं दादागिरी करु नये; रामदास आठवलेंचं आवाहन

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेने दादागिरी करु नये, असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

मुंबईच्या विषयावर कंगना रणौतने सुरुवातीला पीओकेची उपमा देण्याच्या भूमिकेचे आम्ही समर्थन करीत नाही. त्यानंतर कंगनाने ‘जय मुंबई, जय महाराष्ट्र’ची भूमिका घेऊन त्याबद्दल माफी मागितली असल्यासारखे आहे. त्यामुळे शिवसेनेने आता शांत व्हावे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे महिलांचा सन्मान करणारे नेते होते. शिवसेनेने आता अभिनेत्री महिला असणाऱ्या कंगनाबाबतचा अतिरेक थांबवावा, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी लवकरच कंगना रणौतला भेटणार आहे. ज्या मुंबई मनपा अधिकाऱ्यांनी कंगनाचे कार्यालय तोडले त्या अधिकाऱ्यांविरुद्ध कंगनाने कोर्टात जाण्याचा मी सल्ला देणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

संजय राऊतांच्या खासदारकीचा राजीनामा घ्या; नवनीत राणा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

उद्धव ठाकरे, आज माझं घर तोडलं, उद्या तुझा गर्व तुटेल; कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख

…तर पुढचं अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्यावं; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

राज्याच्या इतिहासातील आजचा दिवस हा काळा दिवस; चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका