मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
नाना पटोले हे नेते किंवा मंत्री नाहीत, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. नाना पटोलेंची भूमिका मविआला कमकुवत करण्याची आहे. मविआला अडचणीत आणणारी आहे, असं अजित पवारांनी म्हटलं.
दरम्यान, नाना पटोलेंची भूमिका ही महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे, असं म्हणत अजित पवार यांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली.
महत्वाच्या घडामोडी –
नाना पटोलेंनी स्वबळाचा नारा देताच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकली- प्रवीण दरेकर
“कोरोना संकट काळात उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री झाला नसता, हे त्यांनी आपल्या कार्याने दाखवून दिलं”
देशात जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; रामदास आठवले यांची मागणी
सहकार खातं अमित शहांकडे गेल्यानं घाबरण्याचं कारण नाही- संजय राऊत