नागाणं फणा काढावा, असा चेहरा आहे म्हणणाऱ्या राज ठाकरेंना जितेंद्र आव्हाडांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…

0
445

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल ठाणे येथे भव्य सभा भरवण्यात आली. या सभेत जोरदार टोलेबाजी करत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

यांची बाजू घेणारे इकडचे आव्हाड. काय पण चेहरा आहे.. नागानं फणा काढावा, असा चेहरा आहे., असा टोला राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाडांना लगावला. उद्या काहीतरी म्हणेलच, डसू शकतो वगैरे.. ये.. शेपूट धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो. म्हणे राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला, तरी मी संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. बरं इकडून-तिकडून तुला वस्तरा दिसला? याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला, असा जोरदार हल्लाबोल राज ठाकरेंनी कालच्या सभेत केला. यावरून जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “मोठी बातमी! सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली, अतिदक्षता विभागात उपचार सूरू”

त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली आहे की माझं तोडं काहीतरी नागाच्या फण्यासारखं दिसतं. अशा वैयक्तिक कोट्या तर कोणालाही करता येतात. ते मिमिक्री आर्टिस्टचं काम आहे. पण ज्याच्यात प्रगल्भता आहे, जो समोरच्यांचा आादर करतो जे महाराष्ट्राच्या मातीची शिकवण आहे, ज्याची समाजात प्रतिष्ठा आहे त्यांना मी अरे तुरे करत नाही. माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे असं जर तुम्ही म्हणाल तर मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे हे म्हणावं का? तो भाग कोणता हे महाराष्ट्र ओळखतो, असं जोरदार प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंना दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

कमळाचा चिखल गेला कोठे?; किशोरी पेडणेकरांचा किरीट सोमय्यांवर निशाणा

शरद पवार स्वत: नास्तिक आहेत, त्यामुळे…; राज ठाकरेंचा थेट शरद पवारांवर निशाणा

भाजपला 2024 मध्ये तब्बल 400 जागा मिळतील; रामदास आठवलेंचा विश्वास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here