मुंबई : हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना एन्काउंटरमध्ये पोलिसांनी ठार केलं आहे. यावर अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या. आता राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही ट्वीट करत प्रतिक्रीया दिली आहे.
बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश आहे. बलात्काऱ्यांना निश्चित वेळेत कठोर शिक्षा मिळण्यासाठी कायदे कडक करण्याची आवश्यकता आहे. आता पर्यंत झालं ते खुप झालं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश आहे. बलात्काऱ्यांना निश्चित वेळेत कठोर शिक्षा मिळण्यासाठी कायदे कडक करण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत झालं ते खुप झालं…
— Supriya Sule (@supriya_sule) December 7, 2019
देशात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहे. त्याचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवूनही आरोपींना लवकर फाशी होत नसले तर पोलिसांनी केलेले एन्काउंटर योग्यच आहे, असं मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो. असं ट्वीट राज ठाकरे यांनीही केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
हिंदू समाज जागृत झाला तर गाईंची कत्तल थांबेल- मोहन भागवत
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचं कर्करोगामुळे निधन
‘मी पुन्हा येईन’ या वाक्यात मी पणाचा दर्प नव्हता; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवार यांना पलटवार