Home महाराष्ट्र सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच होती- नारायण राणे

सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच होती- नारायण राणे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : तपास यंत्रणाकडून केल्या जात असलेल्या छापेमारीवरून केंद्रीय सुक्ष्म, लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का? असा सवाल करतानाच सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच होती, असा दावा राणे यांनी केला आहे.

हे ही वाचा : “…अन्यथा राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारला उलथवल्याशिवाय राहणार नाही”

दरम्यान, यावेळी मुंबई महानगरपालिकेत सत्ता बदल दिसणार असल्याचा दावाही नारायण राणेंनी केला. मी 55 वर्ष राजकारणात आहे. त्यामुळे यासाठीचे धोरण मी सांगणार नाही. तीन पक्षांना कुठलीच निवडणुक नकोत. जनता त्यांना निवडून देणार नाही हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे निवडणुका नको आहेत आणि त्या पुढे ढकलल्या जातायत अशी मागणी आघाडी सरकार करतेय. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचं काम छगन भुजबळांकडे दिलं गेल्याची टीका नारायण राणे यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

मीही इंग्रजीत प्रश्न विचारला असता पण…; विनायक राऊतांनी नारायण राणेंना डिवचलं

गेली 25 वर्षे त्यांची महापालिकेवर सत्ता आहे, पण…; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

शरद पवारांनी 25 वर्षांपूर्वी जे सांगितलं, आम्हांला ते 2 वर्षांपूर्वी समजलं; संजय राऊतांचा भाजपला टोला