मुंबई : मुंबईत कोरोना नियंत्रणात आल्याने हाॅटेल्स, रेस्टाॅरंट, बार तसेच दुकाने या सर्वांसाठी 2 ते 3 तासांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. शुक्रवारपासून याच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मदतीसाठी राजा येत नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता, आता मंदिरे तरी उघडा असा आर्जव करतेय.. त्यावेळी नगरात कुणीही मागणी केली नसताना.. पब, बार, रेस्टॉरंट रात्री 11.30 पर्यंत खुले ठेवून नाईटलाईफची काळजी राजपुत्र करीत आहेत.. दुर्दैवी चित्र.. महाराष्ट्र नगरी आणि चौपट राजा!, असं ट्विट करत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
मदतीसाठी राजा येत नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता, आता मंदिरे तरी उघडा असा आर्जव करतेय..
त्यावेळी नगरात कुणीही मागणी केली नसताना..
पब,बार, रेस्टॉरंट रात्री 11.30 पर्यंत खुले ठेवून”नाईटलाईफची”काळजी “राजपुत्र” करीत आहेत..दुर्दैवी चित्र..
“महाराष्ट्र” नगरी आणि चौपट राजा!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 16, 2020
महत्वाच्या घडामोडी-
औरंगाबाद हादरलं!! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, चिमुकलीचा ओठ तुटला
…अन्यथा लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल; बाळा नांदगावकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका
“सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण”
….तर ठाकरे सरकार शिवसेनेची देखील चौकशी करणार का?; आशिष शेलारांचा सवाल