Home महाराष्ट्र पंतप्रधानांनी अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना लायकी दाखवली; अतुल भातखळकर यांची नाव न घेता टीका

पंतप्रधानांनी अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना लायकी दाखवली; अतुल भातखळकर यांची नाव न घेता टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज करोना पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या, यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता  टिका केली आहे.

“आज देशाला केलेल्या संबोधनात पंतप्रधानांनी देशातील दोन अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना त्यांची लायकी दाखवली. बडबड वीरांनी आता तरी आपली पोच ओळखून बाता माराव्या…” असं  अतुल भातखळकर  म्हणाले आहेत.

आधी लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी करून तोंडावर आपटलेल्या महाराष्ट्र, दिल्ली आदी राज्य सरकारांच्या अपयशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्सीर मात्रा लागू केली. आजच्या जाहीर संबोधनात पंतप्रधानांनी जनतेला दिलासा देणारी सर्वांना मोफत लस योजनेची घोषणा केली, असंही अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 21 जूनपासून देशातील सर्व राज्यातील 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस उपलब्ध करून देईल. लस निर्मात्याकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के लस केंद्र सरकार स्वतः खरेदी करून राज्यांना देईल. त्यामुळे राज्यांना काहीही खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे देशातील कोणत्याही राज्याला लस खरेदीवर कोणताही खर्च करावा लागणार नाही. आतापर्यंत देशातल्या करोडो लोकांना मोफत लस मिळाली आहे. आता यात 18 वर्षांपुढील लोकंही समाविष्ट होतील,” अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट”

21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाथाभाऊंनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं- चंद्रकांत पाटील

…तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा- निलेश राणे