चावटपणा करणाऱ्याची चौकशीच नाही तर त्याला शिक्षाही झाली पाहिजे; गुलाबराव पाटील कडाडले

0
639

मुंबई : रावेर मतदारसंघातील भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर आक्षेपार्ह माहिती लिहिण्यात आली होती. यावर शिवसेना नेते व सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महिलांचा सन्मान ठेवणारं आमचे राज्य आणि देशही आहे. त्यामुळे अशा प्रकारचा चावटपणा करणाऱ्याला आत टाकलं पाहिजे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान, हा प्रकार अतिशय संतापजनक आहे. कोणत्याही महिलेच्या विरुद्ध कुणी असं आक्षेपार्ह लिहित असेल तर त्याची फक्त चौकशीच नाही तर त्याला शिक्षाही झाली पाहिजे, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“माझा होशिल ना फेम आदित्य ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात”

भाजपला जेंव्हा कुणी विचारत नव्हतं तेंव्हा…- प्रीतम मुंडे

लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार?- उदयनराजे भोसले

“देवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here