Home महाराष्ट्र जो पक्ष स्वतःचा अध्यक्ष ठरवू शकत नाही तो पक्ष पुढचे निर्णय काय...

जो पक्ष स्वतःचा अध्यक्ष ठरवू शकत नाही तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई : काँग्रेस पक्षामध्ये सध्या अध्यक्षपदावरून वादविवाद सुरु आहे. या वादावरून जो पक्ष स्वतःचा अध्यक्ष ठरवू शकत नाही, तो पक्षा निर्णय कसे काय घेऊ शकणार, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

“महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मताकडे आम्ही लक्ष देणार नाही. कारण जो पक्ष स्वतःचा अध्यक्ष ठरवू शकत नाही तो पक्ष पुढचे निर्णय योग्य पद्धतीने कसे घेऊ शकणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काँग्रेसपक्षात एका अध्यपदावरून इतके वाद सुरु आहेत. सोनिया गांधी यांची इच्छा नसताना देखील त्यांना अध्य़क्ष रहावं लागतंय. देशातील इतक्या मोठ्या पक्षाची अशी अवस्था का झाली याचं आत्मचिंतन करायला हवं, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

गांधी कुटुंबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष होऊ शकते; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य

“काँग्रेसच्या नाराज आमदारांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा”

“मराठा आरक्षणावर आज सुनावणी”

“विविध मागण्यांसाठी नर्सेसचं राज्यव्यापी दोन तास कामबंद आंदोलन”