मालकाच्या कर्तृत्वाचं असं जाहीर पोतेरं करू नये; अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना टोला

0
158

मुंबई : ओडिशा आणि पश्चिम बंगालला तडाखा बसलेल्या यास चक्रीवादळादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मंगळवारी रात्रभर मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात थांबल्या होत्या. त्यासाठी ममता बॅनर्जी यांचं कौतुक करणारी ही बातमी छापून आली, यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी तो फोटो शेअर करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय.

संजय राऊतांचा काय राग आहे कोण जाणे उद्धवजींवर. तौते वादळाच्या काळात उद्धव ठाकरे घरी दडी मारून बसलेले होते हे सांगण्याची काय तऱ्हा आहे पाहा. सामनाची बातमी…यास वादळाचा धोका, ममता रात्रभर मंत्रालयात ठाण मांडणार. मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट”

“मुक्ताईनगरमध्ये भाजपला मोठा धक्का! भाजपच्या 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”

हे काही खुळं सरकार नाही ना…; मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे संतापले

मुंबई महापालिकेचा कोविड लस घोटाळा; किरीट सोमय्यांचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here