Home महाराष्ट्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी; नाना पटोलेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी; नाना पटोलेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका वाढला आहे. तसचं महाडमधील तळीये गावात सर्वात मोठी दुर्घटना घडली असून आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आवाहन  केलं आहे.

“मुसळधार पाऊस, ढगफुटी, पूरस्थिती आणि दरडी कोसळून राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांचे प्राण गेले असून हजारो लाखो लोक पुरामुळे बेघर झाले आहेत. राज्य सरकार बाधित लोकांना मदत करत असून काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आपल्या परीने शक्य ती सर्व मदत करावी,” असं आवाहन नाना पटोले यांनी आहेत.

राज्यात मागील तीन चार दिवसापासून झालेल्या अतिवृष्टी व दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. पुराने थैमान घातले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. राज्यावर आलेली ही नैसर्गिक आपत्ती मोठी आहे. अतिवृष्टीने शेती, शेतमाल, जीवनावश्यक वस्तू, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्त भागात मदत व बचाव कार्याची सध्या मोठी गरज आहे. अन्नधान्य, औषधं, कपडे, राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. जे लोक अडकून पडले आहेत त्यांच्या शोधकामातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“धक्कादायक! वरळीमध्ये इमारत कोसळली, चाैघांचा मृत्यू तर अनेक जखमी”

“कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका, यावेळी तर मनापासून मदत करा”

स्वतःचं पद वाचवण्यासाठी मुख्यमंत्री घरी काळी जादू करत असतात, तशीच…- नितेश राणे

तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्वीकारली; जितेंद्र आव्हाडांची घोषणा