Home महाराष्ट्र राज्यातील विरोधी पक्ष भरकटलेला आहे, त्यामुळे…; संजय राऊतांची टीका

राज्यातील विरोधी पक्ष भरकटलेला आहे, त्यामुळे…; संजय राऊतांची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन होतानाची तत्कालीन परिस्थिती तसेच भाष्य करताना माझ्या एका वाक्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढलं होतं असं सांगितलं, त्यावरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. त्याला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.

भरकटलेल्या मनाची माणसं गांजा प्यायल्यासारखं बोलतात. राजाकरणामध्ये विरोधी पक्ष भरकटलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कोणत्या वक्तव्याची अपेक्षा करणार ? मुनगंटीवार यांना मी अत्यंत संयमी आणि अभ्यासू नेते समजत होतो. त्यांची भाषणं मी ऐकत आलो आहे. पण कोणी कोणासोबत जावं हा त्यांचा प्रश्न नाही. महाराष्ट्रात तीन पक्षांनी ते ठरवलेलं आहे, असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

हे ही वाचा : “मोठी बातमी! काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती”

“भाजपला कधी राष्ट्रवादीसोतब जावं असं वाटतं. तर कधी शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र असल्याचे ते म्हणतात. भाजपच्या नेत्यांनी केदारनाथला एक महिना जाऊन बसणं गरजेचं आहे. डोकी थंड झाली की नंतर महाराष्ट्रात येऊन त्यांनी राजकारण करावं. सध्या त्यांची मनस्थिती चांगली नाही. त्यांच मनस्वास्थ ठीक व्हावं यासाठी मी नव्या वर्षानिमित्त प्रार्थना करतो, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान, शिवसेनेसोबतची आमची युती ही ऐतिहासिक चूक होती. आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणे योग्य होते, असं वक्तव्य माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी – 

 सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचा विजय, महाविकास आघाडी पराभूत; निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नितेश राणे प्रकरणावरून बॅनरबाजी; “नितेश राणे हरवला आहे, माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस”

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणेंचं वर्चस्व; जिंकल्या 19 पैकी 10 जागा