मुंबई : राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा आता 97 वर पोहोचला आहे. राज्यात नव्याने 8 रुग्ण आढळले असून यामध्ये सांगलीत 4 , मुंबईत 3 तर साताऱ्यात एक रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरस आता गुणाकारच्या पटीने वाढत जाईल, अशी भिती मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी रविवारीच व्यक्त केली होती. आणि आजच्या दिवशी ही संख्या तब्बल 10 रूग्णांनी वाढल्याची माहिती मिळाली आहे.
Total #COVID19 positive cases rise to 97 in Maharashtra: Health Minister, PRO
— ANI (@ANI) March 23, 2020
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी जनतेशी संवाद साधताना राज्यात आजपासून संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“टाळया किंवा थाळया वाजवून हा करोना विषाणू जाणार नाही”
महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
…तर राज्यात संचारबंदीही लागू केली जाईल- अजित पवार
राज्यात रक्तसाठ्याचा तुटवडा; रक्तदान करा आरोग्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन