आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : पुढील काळात राज्याचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल, असं वक्तव्य माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केलं. शनिवारी रात्री मिरजेत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना सर्वाधिक मत्ताधिक्य मिरजेने दिले, ही निवडणुक सोपी नव्हती. ज्या पक्षात आम्ही काम करत होते त्याचे पक्षाचे तिकिट मिळत नव्हते, त्यामुळे अन्याय होत असल्याचे पाहून जनतेनेच या निवडणुकीत साथ दिली. जनतेने काँग्रेस पक्षाला आणि पक्षाच्या विचाराला साथ दिली. काँग्रेसचे विचार वाचविण्यासाठी जनतेने ही निवडणुक हातात घेतली. मिरज विधानसेभेसाठी कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसचा झेंडा फडकला पाहिजे, असं विश्वजित कदम म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; देवेंद्र फडणवीस यांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती
दरम्यान, नूतन खासदार विशाल पाटील यांचा मिरज विधानसभा मतदार संघाच्यावतीने जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. कदम बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, युवा नेते जितेश कदम, सुरेश आवटी, संजय मेंढे, माजी महापौर किशोर जामदार आदींसह मिरज शहर व पूर्व भागातील अनेक गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत केली शैक्षणिक साहित्याची मदत
अजित पवार गटाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता महाविकास आघडीच्या वाटेवर?
गोपाळकृष्ण शाळेत चिमुकल्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत