राष्ट्रवादीकडे कुठले मुद्दे नाहीत, त्यामुळे…; दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन फडणवीसांची टीका

0
416

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दीला आहे.

आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की प्रवीण दरेकर यांनी बोलीभाषेत अशाप्रकारचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे कुठले मुद्दे नाहीत. त्यामुळे असे मुद्दे हाताशी घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली होती.

महत्वाच्या घडामोडी –

“72 तासांच्या आत माफी मागा अन्यथा…”; मंत्री अनिल परबांकडून सोमय्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा

प्रवीण दरेकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; पुण्यात जोडे मारो आंदोलन

…तर मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं; अण्णा हजारेंचा इशारा

“…तर कंगनाविरोधात अटक वॉरंट काढू”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here