Home देश आग्रातील संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणार- योगी आदित्यनाथ

आग्रातील संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणार- योगी आदित्यनाथ

आग्रामधे मुघल संग्रहालयाचे बांधकाम सुरु आहे. उत्तर प्रदेशमध्ये बांधल्या जाणाऱ्या या संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणार आहे, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

आगरातील निर्माणाधीन म्यूजियमला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जाईल. गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतिक चिन्हांचा नव्या उत्तर प्रदेशमध्ये काहीही स्थान नाही. आपल्या सर्वांचे नायक हे छत्रपती शिवाजी महाराज आहे, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तसेच ऐतिहासिक ताजमहालच्या पूर्वेकडील द्वारावर हे संग्रहालय बांधण्यात येत असून सुमारे दीडशे कोटींचा हा प्रकल्प आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास या संग्रहालयाच्या माध्यमातून जगभर पोहोवण्याचा यूपी सरकारचा उद्देश आहे.

महत्वाच्या घडामोडी-

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावीशी भाजपला का वाटलं नाही?; गुलाबराव पाटलांचा सवाल

ठाकरे ब्रँड हे काय नवीन काढलं?; चंद्रकांत पटलांचा शिवसेनेला टोला

कंगनाचा उद्धव ठाकरेंवर आणखी एक ‘ट्विट’हल्ला; म्हणाली…

…म्हणून ठाकरे सरकार बदनाम आहे; किरीट सोमय्यांचा टोला