मुंबई : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पेट्रोल डिझेलचे दर वाढवून मोदी सरकार लोकांचे खिसे कापत असून हे पाकिटमार सरकार बनले आहे, असं म्हणत दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल दर वाढतच आहेत. काही जिल्हयात पेट्रोलचा दर शंभरावर पोचला आहे. जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत, हे मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
कोरोनाचे संकट असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे याचे पडसाद महागाई वाढण्यावर होत आहेत. त्यामुळे मोदी सरकारने लोकांची लूट थांबवावी. जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत तेच भारतात असले पाहिजे, असंही मलिक यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी कोरोना पाॅझिटिव्ह”
“उद्धव ठाकरेंसारखा स्वातंत्र्य देणारा मुख्यमंत्री लाभला हे माझं भाग्य”
प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की…- रुपाली चाकणकर
“…तर आधी जयंत पाटलांनी महाराष्ट्रातील गोरगरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला त्याचा खुलासा करावा”