मुंबई : जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणतात जे आमदार भाजपमध्ये गेले त्यांनी परत या, आम्ही त्यांना निवडून आणतो. या माणसाला शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस आमदारांना परत निवडून आणण्याची भाषा करतो., असं ट्विट करत निलेश राणेंनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.
अजित पवार म्हणतात जे आमदार भाजपमध्ये गेले त्यांनी परत या, आम्ही त्यांना निवडून आणतो. या माणसाला शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस आमदारांना परत निवडून आणण्याची भाषा करतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 18, 2020
महत्वाच्या घडामोडी-
जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवायला हवा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करू शकलो असतो पण…; पडळकरांचं राऊतांना पत्र
“भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल”
कोण संजय राऊत?; चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर टीका