Home नागपूर महाविकास आघाडी पाच वर्ष नाही, तर पुढील 25 वर्षे राज्याची सेवा करणार-...

महाविकास आघाडी पाच वर्ष नाही, तर पुढील 25 वर्षे राज्याची सेवा करणार- सुप्रिया सुळे

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या चर्चा सूरू आहेत. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

महाविकास आघाडी सरकार पुढील 5 वर्षे नाही तर 25 वर्षे राज्याची सेवा करेल, असं मत सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केलं. सुप्रिया सुळे या आजपासून 2 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यासंदर्भातील माहिती देताना सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

पत्रकारांनी त्यांना देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शुक्रवारी रात्री भेटीबाबत प्रश्न विचारला. यावर सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं. मी इम्पल्सीव्ह नाहीय. मी लगेच एखाद्या गोष्टीवर कमेंट करत नाही. मी थोडा विचार करण्यासाठी वेळ घेते आणि मग बोलते. मी विचार करुन बोलते त्यामुळे मी लगेच प्रतिक्रिया देणार नाही. तसेच विचारधारा सोडून एकमेकांसोबत चांगले संबंध असतील तर मी त्याचं स्वागतच करेन., असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, माझ्यावर जे संस्कार झालेत त्याला यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्याचा वारसा आहे. त्यांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध होते त्यामुळेच मी अशा भेटी होत असतील आणि राजकीय विचारसरणी बाजूला ठेऊन भेटीगाठी होत असतील तर त्याचं स्वागतच करेन, असंही सुप्रिया सुळेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

वंचितला धक्का! आणखी 2 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; अजित पवारांची भेट यशस्वी ठरली

“दीड वर्ष घरी बसून फेसबुक लाईव्हवर जनतेला कोरडे उपदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना, कोण श्रेय देणार?”

सेना-भाजप युतीबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

आज पण राणेंमुळं शिवसेनेत पद मिळतात, राणे बस नाम ही काफी है; नितेश राणेंचा टोला