महाविकास आघाडी सरकार भूईसपाट होईल ; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

0
394

मुंबई :  जिथे जिथे निवडणुका होतील, तिथे महाविकास आघाडी भूईसपाट होईल, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा मुंबईनंतर आता रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या यात्रेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपा राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी बोलताना या चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

जन आशीर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर लोक खूश आहेत. पंढरपूर आणि साडे सहा हजार गावांमध्ये सत्ताधारी पराभूत झाले. आता यापुढे जिथे जिथे निवडणुका होतील, तिथे भूईसपाट होतील. या यात्रेतील प्रतिसादावरून दिसत आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

यंदाही दहीहंडीबाबत निर्बंध कायम; ठाकरे सरकारचे गोविंदा पथकांना आवाहन

महाविकास आघाडी सरकार म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

“नाना पटोले अडाणी भाषेत टीका करतात, मग रावसाहेब दानवेंनी केली तर मिरच्या का झोंबल्या?”

14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ठ कसा?; चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here