मुंबई : जिथे जिथे निवडणुका होतील, तिथे महाविकास आघाडी भूईसपाट होईल, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा मुंबईनंतर आता रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या यात्रेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपा राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी बोलताना या चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
जन आशीर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर लोक खूश आहेत. पंढरपूर आणि साडे सहा हजार गावांमध्ये सत्ताधारी पराभूत झाले. आता यापुढे जिथे जिथे निवडणुका होतील, तिथे भूईसपाट होतील. या यात्रेतील प्रतिसादावरून दिसत आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री मा. श्री. @MeNarayanRane यांच्या जन आशिर्वाद यात्रेची सुरुवात माझ्या उपस्थितित कोकणातून झाली. कोकणवासीयांचे राणेसाहेबांवरील प्रेम या निमित्ताने पुन्हा एकदा दिसले. कोकणवासीयांचा आशीर्वाद नेहमीच भाजपासोबत राहील, याची मला खात्री आहे.@blsanthosh pic.twitter.com/QOTJGzYBMZ
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 23, 2021
महत्वाच्या घडामोडी –
यंदाही दहीहंडीबाबत निर्बंध कायम; ठाकरे सरकारचे गोविंदा पथकांना आवाहन
महाविकास आघाडी सरकार म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
“नाना पटोले अडाणी भाषेत टीका करतात, मग रावसाहेब दानवेंनी केली तर मिरच्या का झोंबल्या?”
14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ठ कसा?; चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल