मुंबई : राज्यात जमिनीचे तुकडे पाडून त्याची खरेदी विक्री करण्यावर महाविकास आघाडी सरकारने काही निर्बंध आणले आहेत. यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारी मोजणीची जर अडचण असेल तर ती सरकारनं सोडवावी. आणि लोकांच्या व्यवहारातील अडचण दूर करण्याचे काम सरकारनं करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु हे न करता जिरायत जमीन 2 एकरापेक्षा कमी असेल आणि बागायत शेती 20 गुंठ्यापेक्षा कमी असेल, तर जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. जाऊ तिथं खाऊ असं काम महाविकास आघाडी सरकारचं सुरू आहे, असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या या निर्बंधांनुसार आता जमिनीचे गुंठ्यात तुकडे पाडून त्याची थेट खरेदी अथवा विक्री करता येणार नाही. जमिनीचे गुंठ्यांत तुकडे पाडून त्याची खरेदी अथवा विक्री करायची असेल तर त्यासाठी सक्षम प्राधिकरण अथवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“…त्यामुळे पंकजा मुंडेंच्या डोळ्यात अश्रू आले; त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपल्याला समजले पाहिजे”
आमच्या नेत्यांवर बोलाल तर…; नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा
2024 ला आमचं एकच इंजिन असणार; युतीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
सुवर्ण पदक पटकावलंच! टोक्योमध्ये नीरज चोप्रानं घडवला इतिहास