आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : ‘महाविकास आघाडी सरकारनं राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची काहीच कारणे शिल्लक ठेवली नाहीत’, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलता होते.
राष्ट्रपती राजवाट लागण्यासाठीची काहीच कारणे राज्य सरकारने शिल्लक ठेवली नाहीत. राज्यपालांनी याबाबत दे होतंय ते होऊ दे म्हणून बाजू काढली आहे. हे सरकार मात्र राज्यपालांचे अधिकार कमी करत सुटले आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
हे ही वाचा : महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ ठिकाणी उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक
दरम्यान, राज्य सरकारकडून कुलगुरु पदासाठी दोन नावे राज्यपालांना पाठवली जाणार आहेत. राज्यापालांना त्यातील एक नाव निवडावे लागणार आहे. तसंच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे प्र-कुलपती असणार आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यापीठ कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी अधिवेशानात याबाबत सुधारणा विधेयक मांडले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील कोल्हापूरात आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
‘…पण मोर्चा काढूच’; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे सरकारला इशारा
माझे 30-35 आमदार होऊ द्या, 10 मिनिटांत गंमत करून दाखवतो; महादेव जानकरांचं मोठं वक्तव्य
“जिथे संकट तिथे शिवसेना, हा इतिहास आहे”