मुंबई : महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रात काहीही विचित्र सुरु
आहे असं नाही. सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात झाल्या त्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्र सरकार गांभीर्याने आणि धैर्याने करोनाचा सामना करतं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
सहा महिन्याच्या बाळाने करोनाला हरवलं आहे. त्या मुलाच्या आईशी मी बोललो आहे. सहा महिन्याचं बाळ करोनाला हरवू शकतं हेदेखील लक्षात घ्या. त्यामुळे करोनाची लागण झाली म्हणजे सगळं काही संपलं असं नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, करोनाचं संकट संपल्यानंतर आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार आहे. त्या संकटाचा सामना करण्यासाठी माझे सगळेच सहकारी काम करत आहेत. हे जे संकट आहे त्याला धीराने तोंड देण्याची गरज आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
उद्धव ठाकरेंनी मानले भिम सैनिकांचे आभार; म्हणाले…
अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाले…
मी रणांगणात उतरलो तर महागात पडेल; चंद्रकांत पाटलांचा पलटवार
जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात आलेल्या 14 जणांना करोना