Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचा महाड दाैरा म्हणजे वराती मागून घोडे; प्रवीण दरेकरांचा घणाघात

मुख्यमंत्र्यांचा महाड दाैरा म्हणजे वराती मागून घोडे; प्रवीण दरेकरांचा घणाघात

मुंबई : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. राज्यातील अनेक भागात पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी महाडमधील तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी केली. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्र्यांचा महाडचा दौरा म्हणजे या सरकारचे वराती मागून घोडे आहेत. सरकारने आता तरी जागं व्हावं. सरकारची बेफिकीरी हा चिंतेचा विषय आहे. लोकांना तातडीने मदत मिळणं गरजेचं असून त्यांचं स्थलांतर करणंही गरजेचं आहे, असं दरेकर म्हणाले.

दरम्यान, राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून प्रवीण दरेकर हे चिपळूण, कोल्हापूर, सांगली, महाडच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी त्यांनी ते टी.व्ही.9 मराठीशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

सांगली जिल्ह्याला पुराचा फटका, मात्र सुदैवानं 2019 सारखी परिस्थिती नाही- विश्वजित कदम

सरकारतर्फे संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल; महाड दाैऱ्यात मुख्यमंत्र्यांचं गावकऱ्यांना आश्वासन

जनता पुरात, पालकमंत्री मुंबईत, हे पालकमंत्री नव्हे, हे पळपुटे मंत्री; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

सांगलीकराना मिळणार दिलासा; कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होण्याची शक्यता