मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपनेते निलेश राणे यांच्यात ट्विटरवर वॉर सुरू झालं आहे. या वादात आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उडी घेतली आहे.
आपली पातळी किती खाली न्यायाची? एखाद्याची पातळी फार खालची असते. त्या पातळीपर्यंत आपण जायचं नसतं. असा सल्ला जयंत पाटील यांनी रोहित पवार यांना दिला आहे.
दरम्यान, काही वेळाने अशा लोकांचा नादच सोडून द्यायचा. आपण एका मर्यादेपर्यंत कुणाच्या तोंडाला लागायचं हे ठरवायचं असतं. एका मर्यादेनंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. काही लोक घरी बसून वेगवेगळ्या वल्गना करत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. रोहित पवार दुर्लश करतील, असा मला विश्वास आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-़
खासदार धैर्यशील माने यांनी दिलं होम क्वारंटाईनसाठी स्वतःचं घर
निलेश राणेंनी रोहित पवारांची काढली लायकी; म्हणाले…
घराच्या अंगणाला ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत; अजित पवार संतापले
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं- चंद्रकांत पाटील