आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जात होते. यावेळी सोमय्या यांच्याविरोधात पुण्यात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
इतकंच नाही तर काही शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला. या सगळ्या गोंधळात सोमय्या हे पायऱ्यांवर पडल्याचं पहायला मिळालं. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : नागपूरात महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा नारा?
किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता, असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. महापालिकेची सुरक्षा कुठे होती? पोलीस कुठे होते? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.
भाजपा नेते @KiritSomaiya यांच्यावर आज पुण्यात शिवसेनेकडून प्राणघातक हल्ला झाला. परमेश्वर कृपेने या हल्ल्यातून किरीटजी बचावले. त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.
किरीटजी आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है। pic.twitter.com/or3PxREwJg
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 5, 2022
दरम्यान, सोमय्यांना मारण्याची पूर्ण योजना झाली होती. सत्य लपणार नाही. सोमय्या यांच्या हाताला दुखापत झालीय. त्यांच्या कंबरेला मार लागला आहे. आज त्यांना ठार मारण्याचाच हेतू होता. केंद्र सरकारची सुरक्षा नसती तर आज सोमय्यांना श्रद्धांजली वाहावी लागली असती, असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
अमृता फडणवीसांच्या ‘ट्रॅफिकमुळे घटस्फोट’ विधानावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
शिवसैनिकांचा किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला?; किरीट सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले
उदयनराजे भोसले पुन्हा राष्ट्रवादीत जाणार?; अजित पवारांसोबत भेटीनंतर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…