मुंबई : “मुंबईच्या आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या जागेचा व्यावसायिक वापर होणार होता. त्या ठिकाणची जागा ही मेट्रो डेपोसोबतच व्यवसायासाठी वापरण्याचे आदेश देण्यात आले होते” असा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला.
मेट्रो कारशेडसोबत मेट्रो डेपो आणि कमर्शिअलसाठी ती जागा वापरण्याचा डाव होता. त्या संदर्भातच जनआक्रोश आंदोलन केलं. त्याचं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह तत्कालीन भाजप सरकारने मुंबईकरांना याबाबत उत्तर द्यावे, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.
कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारची असताना जाणीवपूर्वक केंद्राची दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने आरेमध्ये मेट्रोची कारशेड उभारण्याचा घाट घातला होता. सुरुवातीला कमी जागेची परवानगी दिली होती. मात्र फडणवीस सरकारने 61 हेक्टर जागा कारशेडसाठी वापरली. विशेष म्हणजे केवळ कारशेडसाठीच नाही तर त्यासोबतच व्यावसायिक जागेसाठी ती जागा सरकारला वापरायची होती,” असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
आमदारकीसाठी अनेकजण इच्छुक होते, पण प्रत्येकाला संधी देणं शक्य नाही- जयंत पाटील
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर स्पष्टवक्ता आहेत, त्यांचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल- संजय राऊत
तज्ञांच्या समितीपेक्षा सचिन सावंत यांना जास्त अक्कल आहे का?- आशिष शेलार