मुंबई : रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. याच प्रकरणावरून भाजपते नेते आशिष शेलार यांनी सामनाचे कार्यकारी संपादक व शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
एका “युवच्या सदऱ्याराजला” वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय?, असा सवाल करत अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमवर दिसू लागलेत, आशिष शेलार यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.
त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलीसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांना खोटे ठरवून आता एका “सिंह” यांना “परमवीर” का देताय?
खरी नौटंकी तर हीच आहे.
एका “युवराजला” वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय?पत्रपंडित हो,अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत?
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 5, 2020
रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा! अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा, पण एक मराठी कुटुंब उभे करुन तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय?. एका मराठी कुटुंबाची ढाल करुन “दिशा सालीयन” बाबत बोलणाऱ्यांची तोंड का बंद करताय? बात और भी निकलेगी…,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा!
अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा,
पण एक मराठी कुटुंब उभे करुन तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय?
एका मराठी कुटुंबाची ढाल करुन
“दिशा सालीयन” बाबत बोलणाऱ्यांची तोंड का बंद करताय?
बात और भी निकलेगी…
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 5, 2020
महत्वाच्या घडामोडी-
त्यावेळी भाजप नेत्यांना ‘आणीबाणी’ आठवली नाही; अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपला टोला
अर्णव गोस्वामी हा भाजपचा प्रवक्ता, म्हणून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत- संजय राऊत
नोव्हेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरु होईल; विजय वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण