मला प्रतिवादी करण्याचा विचार हास्यास्पद; संजय राऊतांचा कंगणा रणाैतला टोला

0
12

मुंबई : मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रणाैतच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून उखाड दिया अशी बातमी प्रकाशित झाली होती. यावरून कंगना रणाैतने संजय राऊत यांना कोर्टात खेचण्याची तयारी केली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर देत कंगणाला टोला लगावला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

खटल्यामध्ये प्रतिवादी करण्याचा विचार हास्यास्पद आहे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले की, हे हास्यास्पद आहे. बेकायदेशीर बांधकाम झालं असेल तर ते तोडण्याचा अधिकार मुंबई महापालिकेला आहे. मुंबई महापालिका स्वतंत्र संस्था आहे. त्यांची स्वत:ची यंत्रणा आहे. राज्य सरकार, राजकीय नेते किंवा खासदार त्यांच्यात हस्तक्षेप करु शकत नाहीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बेकायदेशीर बांधकाम करुन कांगावा करायचा आणि त्यात मला ओढून राजकारण करायचं. माझ्या वक्तव्यामध्ये एवढी ताकद असेल तर चीनने केलेलं बांधकाम तोडलं असतं. काही महिन्यांपासून महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुनियोजित तयारी सुरु आहे. महाराष्ट्राला बदनाम करायचं, मुंबई बदनाम करायचं, मराठी लोकांना बदनाम करायचं याचं षडयंत्र पदड्यामागे रचलं जात आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात FIR दाखल

“शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण”

राजस्थान राॅयल्सची विजयी सलामी; चेन्नई सुपर किंग्सचा 16 धावांनी पराभव

बाबरीपासून ते मराठी अभिमानासाठी लढण्यापर्यंत अनेक खटले अंगावर घेतलं; संजय राऊतांचं कंगणाला प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here