गरम असलेल्या शशिकांत शिंदेंना थंड करुन घरी बसवणार; शिवेंद्रराजे भडकले

0
412

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : माझी शिफारस कमी पडल्याने शिवेंद्रसिंहराजे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत. मागील वेळी मी शिफारस केल्यानेच त्यांना बँकेचे अध्यक्षपद मिळाले होते, असा दावा आमदार शशिकांत शिंदे यांनी केला होता. त्याला आज आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आगामी सातारा, जावळी तालुक्यातील सर्व निवडणूका आम्ही आमच्या बळावर लढणार आहोत. त्यामुळे आमदार शशिकांत शिंदेंनी कितीही लक्ष दिले किंवा ते कितीही गरम झाले, तरी त्यांना थंड करुन घरी बसवू. एवढी ताकत आमच्यामध्ये आहे, असा टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदेना लगावलाय.

हे ही वाचा : शिवसेनेकडून भाजपला मोठा धक्का; वर्ध्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

जावळीतील त्यांचा पराभव त्यांच्याच पक्षातील गटबाजीमुळे झाला असून त्याचे खापर माझ्यावर फोडण्यापेक्षा त्यांनी आत्मचिंतन करावे. तसेच बँकेचे अध्यक्षपद मला मिळणे किंवा न मिळण्याशी त्यांच्या शिफारशीचा कुठलाही संबंध नाही, केवळ सहानभूती मिळवण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले आहेत.

मागील वेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत राष्ट्रवादी भवनात प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. त्यावेळी मी सर्वांना पाच वर्षे अध्यक्षपद देणार असाल तरच मी बँकेचा अध्यक्ष होण्यास तयार आहे, अशी मी भूमिका मांडली होती. त्यावेळी पाच वर्षे अध्यक्षपद देण्यास आमदार शशिकांत शिंदे यांनी हरकत घेतली होती. पण, मला सहा वर्षे अध्यक्ष पद मिळाले. यावेळेस जिल्ह्यातील नेत्यांसह बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुन्हा तुम्ही अध्यक्ष व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या मागणीनुसार मी शरद पवार यांना भेटून दुसऱ्यांदा संधी देण्याची मागणी केली होती. पण, त्यांनी नितीन पाटील यांच्या नावाला मान्यता दिली, असंही शिवेंद्रराजे भोसले म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

मोदी सरकारने ओबीसी बांधवांच्या पाठीत खंजीर खुपसला; राष्ट्रवादीचा आरोप

“पवार साहेबांनी नेमला शिवसेनेचा नवीन कामगार प्रमुख”

माझं उत्तर ऐकून चंद्रकांत पाटलांची प्रकृती बिघडेल; संजय राऊतांचा खोचक टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here