आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. नंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली.
त्यानंतर भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. याप्रकरणी आता जितेंद्र आव्हाडांनी गंभीर आरोप केले आहेत.
जितेंद्र आव्हाडांनी टि्वट करीत त्यांच्यावर कुणाच्या आदेशाने हा प्रकार झाला होता, याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
हे ही वाचा : “ताराराणी चाैकात मनसेचं जंगी स्वागत; राज ठाकरे यांना पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची प्रचंड गर्दी”
हर हर महादेव’ चित्रपटादरम्यान विवियाना येथे झालेल्या गदारोळ प्रकरणातील तक्रारदार परिक्षित धुर्वे ह्याला मनसेच्या ठाण्यातील वरिष्ठ नेत्याने महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याशी बोलणं करुन दिलं आणि त्या दोघांनी मिळून तक्रारदाराच्या पत्नीला माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करण्यास सांगितले, असं आव्हाड म्हणाले.
मी त्या ताईचा आभारी आहे, कि त्या ताईने स्वत:हून सांगितले, कि मी असला घाणेरडा गुन्हा दाखल करु शकत नाही. आणि आपल्या मतावर ती ठाम राहिली. घोडबंदरचा एक नगरसेवक ह्या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी होता. म्हणजे माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करायचा हे कधीपासून ठरलं होतं ते बघा., असं आव्हाडांनी ट्विटमध्ये म्हटलं.
मी त्या ताईचा आभारी आहे, कि त्या ताईने स्वत:हून सांगितले, कि मी असला घाणेरडा गुन्हा दाखल करु शकत नाही. आणि आपल्या मतावर ती ठाम राहिली. घोडबंदरचा एक नगरसेवक ह्या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी होता. म्हणजे माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करायचा हे कधीपासून ठरलं होतं ते बघा.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 29, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
“भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का; ‘या’ महिला नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”
“काँग्रेसची यशस्वी खेळी! भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”