Home देश दोषींना ‘अशी’ शिक्षा केली जाईल की…; हाथरस प्रकरणावर योगी आदित्यनाथांनी सोडलं मौन

दोषींना ‘अशी’ शिक्षा केली जाईल की…; हाथरस प्रकरणावर योगी आदित्यनाथांनी सोडलं मौन

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर देशभरातून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उत्तर प्रदेशमधील सर्व आया-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा नाश निश्चित आहे. असं म्हणत त्यांना अशी शिक्षा केली जाईल की भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिलं जाईल, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तुमचे उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे आणि वचनही आहे,” असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

राहुल गांधी यांना धक्काबुक्की कोण करणार नाही, त्यांचा तोल गेला असावा- रावसाहेब दानवे

“भाजप सरकार सत्तेच्या मस्तीत, ते कधी कोसळतील हे त्यांनाही कळणार नाही”

मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे या घटनेवर काही बोलणार की नाही?- रोहित पवार

उत्तर प्रदेशमध्ये गुंडाराज; महिला सुरक्षित नसून लोकशाहीचा खुन होत आहे- यशोमती ठाकूर