Home महाराष्ट्र महिलांवरील अत्याचार वाढण्यास महाआघाडी सरकारच जबाबदार; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

महिलांवरील अत्याचार वाढण्यास महाआघाडी सरकारच जबाबदार; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात महिलांवरील अत्याचार दिवसे न् दिवस वाढत आहेत. बलात्कार आणि खूनाच्या घटनाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : अमृता फडणवीस राजकारणात येणार का?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

बलात्कार आणि खूनाच्या घटना या निव्वळ सरकारच्या यंत्रणांना अपयश आल्यामुळेच होत आहेत. या सर्व घटनांना राज्य सरकारच जबाबदार असून महिलांवरील अत्याचार रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी यावेळी केली. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

महिलांच्या संरक्षणासाठी आघाडी सरकारकडून पोलीस आणि कायदेशीर यंत्रणेत आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. कुर्ला येथे एका तरुणीचा बलात्कार करून खून करण्याची घटना राज्य सरकारच्या विविध यंत्रणांच्या अपयशामुळेच घडली. आघाडी सरकारने महिलांना सुरक्षा देण्याच्या घोषणा करणे थांबवून पोलीस यंत्रणेत व कायदेशीर प्रक्रियेत आवश्यक ते बदल करावेत, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“मंत्र्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार, मात्र एसटी कर्मचाऱ्याला केवळ 12 हजार पगार हे चुकीचंच”

राज्यसभेत गोंधळ; शिवसेनेचे 2 तर काँग्रेसचे 6 खासदारन निलंबित

“दक्षिण आफ्रिकेतून किती प्रवासी मुंबईत आले?; आदित्य ठाकरेंनी आकडा सांगितल्यावर प्रशासन हादरलं”