आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नियुक्ती आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यानंतरही राज्यपालांनी काहीच निर्णय घेतला नाही. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारींवर जोरदार हल्ला चढवला आहे.
कॅबिनेटमधील प्रमुख सदस्यांनी राज्यपालांना विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तारखेविषयी कळवलं आहे. राज्यपालांना विधिमंडळाचं स्वातंत्र्य आणि महाराष्ट्र सरकारचं महत्त्व कळत असेल तर त्यांनी ताबडतोब तारीख दिली पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट; कोणत्या विषयांवर चर्चा?
दरम्यान, राज्यपालांना पदावरून हटवलं पाहिजे, असं वाटतं का? असा सवाल संजय राऊत यांना केला असता, असं सरकारचं म्हणणं नसून महाराष्ट्राचं म्हणणं आहे. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करत आहेत. हे या राज्यातील घटनात्मक पदावरील व्यक्तीला शोभणारं नाही, असा टोला त्यांनी लगावला. या देशात लोकशाही आणि स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे हे मी वारंवार सांगतोय, अशा प्रकारच्या घटनात्मक संस्थांवर बसवलेल्या राजकीय लोकांमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
‘सरकार जेवायला बोलावतं आणि ताटात काही नसतं’; एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन सदाभाऊ खोतांची टीका
“भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे ओबीसी आरक्षणाचे मारेकरी”
आम्हाला तुझी खूप आठवण येईल वॉर्नी; शेन वाॅर्नच्या निधनावर सचिन तेंडूलकरची भावूक पोस्ट