Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील सरकार स्थिर होतं, स्थिर राहील; जयंत पाटलांचा विरोधकांना टोला

महाराष्ट्रातील सरकार स्थिर होतं, स्थिर राहील; जयंत पाटलांचा विरोधकांना टोला

मुंबई :  निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या निर्णयामुळे सरकार अस्थिर करू पाहणाऱ्यांच्या हाती अपयश लागलं आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थिर होतं, स्थिर राहील. कोरोनाविरोधातील लढा आम्ही यशस्वी करूच पण राज्याची अर्थव्यवस्थाही आम्ही पुन्हा सुदृढ करू, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्यात. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी आयोगाला पत्र लिहून तशी विनंती केली होती. निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्यामुळे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे विधान परिषदेवर निवडून जातील आणि तेच राज्याचे मुख्यमंत्री राहतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

देशासह संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढा देत असताना काहीजण राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. लोकशाहीच्या तथाकथित गळचेपीबाबत अनेकांनी राज्यपालांना पत्र लिहिली तर काहींनी देव पाण्यात ठेवले होते. सरकार अस्थिर होईल आणि आम्ही पुन्हा प्रयत्न करु, असं अनेकांना वाटत होतं, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

उद्धव ठाकरेंच्या कामकाजावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला; ‘या’ दिवशी होणार विधान परिषद निवडणुका

संजय राऊत यांनी मानले केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार

उद्धव ठाकरेंचा साधेपणा आणि नम्रपणा पाहून भारावला बिहारचा आमदार; ऑडिओ क्लिप व्हायरल