मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारपरिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, मात्र त्यांनी ठोस पुरावा दिला नाही. हा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण यामध्ये यश येणर नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाऊन आल्यावर हे पत्र समोर आलं आहे व बदली झाल्यानंतरच परमबीर सिंग यांनी हे आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करावी व योग्य तो निर्णय़ घ्यावा. 100 कोटी कुणाकडे गेले, याचा उल्लेख त्या पत्रात नाही, असंही शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
अनिल देशमुखांची कसून चौकशी करा, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे- राज ठाकरे
उद्धवजी, शरद पवार शिवसेना संपवण्याचं काम करत आहेत- चंद्रकांत पाटील
हे ठाकरे सरकार जनतेचा पैसा लुटण्यासाठी बनलं आहे- निलेश राणे
भारताचा इंग्लंडला ‘दणका’ सामना जिंकत मालिकाही घातली खिशात