Home बीड “पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी भाजपच्या माजी मंत्र्यांनी पळपुटेपणा केला”

“पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी भाजपच्या माजी मंत्र्यांनी पळपुटेपणा केला”

बीड : भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी डिसीसी बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. यावर सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देत पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे.

पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या माजी मंत्र्यांनी पळपुटेपणा केला, असं म्हणत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर बोचरी टीका केली आहे.

कोणी निवडणुकीवर बहिष्कार घातला, कुणाला मागील कारभाराचा पश्चाताप झाला किंवा कुणी माघार घेतली तरीही निवडणुकीला 100 टक्के क्षमतेने सामोरे जाऊन मतदान प्रक्रिया पार पाडावी, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान, भाजपकडे मतदार जास्त असताना देखील बहिष्कार टाकणं म्हणजे, यांचं मतदार यांचं ऐकत नाहीत अशी स्थिती दिसून येत आहे, असा टोमणाही धनंजय मुंडेंनी यावेळी लगावला. तसेच एखाद्या राजकीय पक्षाने ऐनवेळी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेणं म्हणजे त्यांना विजयाबद्दल तीळ मात्र विश्वास नसल्याचं लक्षण आहे, असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“पुण्यातील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाण केल्याची तक्रार”

“सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी, यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील”

व्यवहार माझे, जबाबदार वाझे; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला अप्रत्यक्ष टोला

“तू खरंच मूर्ख आहेस…”; सुर्यकुमारची पत्नीने उडवली खिल्ली, व्हिडीओ होतोय व्हायरल