Home महाराष्ट्र परमेश्वराने ठाम भूमिका घेतल्यानेच करोना आणि पूर आला; विश्वजित कदमांचं अजब वक्तव्य

परमेश्वराने ठाम भूमिका घेतल्यानेच करोना आणि पूर आला; विश्वजित कदमांचं अजब वक्तव्य

सांगली : गेल्या वर्षभराहून अधिक काळ देशासह जगावर असलेलं करोना महामारीचं संकट आणि राज्यात दरवर्षी निर्माण होणारी पूरस्थिती या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी आता एक अजब वक्तव्य केलं आहे.

सांगलीत झालेल्या पूर परिषदेत बोलताना विश्वजित कदम असं म्हणाले कि, “परमेश्वराने ठाम भूमिका घेत आपल्याला ही शिक्षा दिली आहे. कारण पिढ्यानपिढ्या आपण फक्त शोषण आणि प्रदूषणच केलं. अनेक खून, चोऱ्या झाल्या. त्यामुळे अखेर परमेश्वराने ठाम भूमिका घेतली आणि कोरोना आला. त्याने आपल्याला घरात बसवलं. त्यानंतर पूर आला. या सगळ्याचा जबरदस्त फटका आपल्या सर्वांनाच बसला आहे. पण आता यावर उपाययोजना करून या समस्या सोडवण्याच्या दिशेने पावलं टाकणं आवश्यक आहे, असं विश्वजित कदम म्हणाल.

दरम्यान, यावेळी मंचावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील देखील उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

“सामनाचं नाव आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करा”; शेलारांची संजय राऊतांवर टीका

“नारायण राणेंना ‘पब्लिसिटी स्टंट’चा मोह आवरता आला नाही”

‘या’ तालुक्यात भाजप-शिवसेना युती कायम; भाजप खासदाराची माहिती

“उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन”