“काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय; भाजपविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे”

0
389

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे, असं म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधलाय.

भाजप हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. देशातील जनता हे पहात आहे. वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : ठाकरे सरकारकडून दोन वर्षांत दबाव आणि दडपशाहीचं राजकारण; भाजपची टीका

सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून भाजपने देशाच्या लोकशाही आणि संविधानाला संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपच्या या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. राहुल गांधी हेच मोदी आणि भाजपाविरोधात ठामपणे उभे राहिले. भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राहुल मोदी सरकारविरोधात लढले, असंही नाना पटोले म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

…म्हणून रामदास आठवलेंनी घेतली अमित शहांची भेट

आदित्य ठाकरे – ममता बॅनर्जी यांच्यातील बंद दाराआड चर्चेवर भाजप आक्रमक ; केली ‘ही’ मागणी

शरद पवारांइतकीच राजकीय उंची असलेल्या ममता बॅनर्जी या एकमेव नेत्या; संजय राऊतांकडून काैतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here