पॅकेजची रिकामी खोकी व विरोधकांची रिकामी डोकी कोरोना युद्धात अडथळे आणत आहेत-संजय राऊत

0
171

मुंबई : कोरोना उपाययोजनांसंदर्भात गुजरात सरकारला अहमदाबाद उच्च न्यायालयाने फैलावर घेतले आहे. तेथील सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षा भयंकर असल्याचे फटकारे उच्च न्यायालयानेच मारले आहेत. यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

पॅकेजची रिकामी खोकी व विरोधकांची रिकामी डोकी महाराष्ट्रातील कोरोना युद्धात अडथळे आणीत आहेत. या रिकाम्या खोक्यांत रिकामी डोकी भरून त्यांना गुजरातच्या अंधारकोठड्या पाहायला पाठवायला हवं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान,  महाराष्ट्रातील सरकारने जी रुग्णालये गेल्या दोन महिन्यांत उभी केली आहेत त्या रुग्णालयांत विरोधी पक्षनेत्यांनी पायधूळ झाडावी व एकदा तीर्थक्षेत्र गुजरातचा दौरा करून यावे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या तयारीची कल्पना येऊ शकेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रात मजुरांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या योगी आदित्यनाथांना आवडलं नसेल- संजय राऊत

अभिनेत्री माधुरी दिक्षीत धावली कामगारांच्या मदतीला

…तर मग महाराष्ट्रात येतानाही परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही; राज ठाकरेंचे आदित्यनाथांना प्रत्युत्तर

राज्य सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारवर खापर फोडत आहे- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here