आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. कोरोना आणि न्यूमोनिया झाल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 28 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला.
लतादीदींची तब्येत शनिवारी अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. लतादीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या, मात्र रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हे ही वाचा : “दारूच्या नशेत बंडाचा केंव्हा सय्यद बंडा झाला कळलेच नाही”
दरम्यान, मुंबईतील पेडर रोड भागातील लता मंगेशकर यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी दुपारी 12.30 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
महत्वाच्या घडामोडी –
“गानकोकिळा लता मंगेशकरांची प्रकृती चिंताजनक, राज ठाकरे यांनी तातडीनं रूग्णालयात घेतली धाव”
किरीट सोमय्यांना ठार मारण्याचाच हेतू होता; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप
नागपूरात महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा नारा?