मुंबई : आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय दुर्देवी असून तो केवळ अहंकारातून घेण्यात आला आहे. असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फेसबुकवर सविस्तर पोस्टद्वारे त्यांनी आपली भूमिका मांडली.
कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 4000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असं म्हणत हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी? असा सवाल देवेंद्र फडणीवस यांनी उपस्थित केला आहे.
कांजूरमार्गच्या जागेचा यापूर्वी सरकारने विचार केला पण त्यावर हायकोर्टाची स्थगिती होती. काही खाजगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला होता. स्थगिती मागे घ्यावी, म्हणून विनंती करण्यात आली त्यावर न्यायालयाने दावे पुढील काळात निकाली निघाले तर त्यासाठीची रक्कम भरण्यास सांगितले, असं फडणवीस म्हणाले.
https://www.facebook.com/devendra.fadnavis/posts/1897727580380165
महत्वाच्या घडामोडी-
सुर्यकुमरा यादव आणि क्विटंन डिकॉकची शनदार फलंदाजी; दिल्ली कॅपिटल्सवर 5 विकेट्सनी पराभव
तेवातिया-रियानची धमाकेदार फलंदाजी; हैदराबादचा 5 विकेट्सनी पराभव
…पण एकनाथ खडसे पक्षांतर करतील हे सत्य आहे; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
हिंमत असेल तर स्वबळावर लढून दाखवा; चंद्रकांत पाटलांचं राष्ट्रवादीला खुलं आव्हान