Home महाराष्ट्र सध्याची ईडीची अवस्था रस्त्यावर चलन काटणाऱ्याप्रमाणे- सुप्रिया सुळे

सध्याची ईडीची अवस्था रस्त्यावर चलन काटणाऱ्याप्रमाणे- सुप्रिया सुळे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर हे सातत्याने आरोप करताना दिसत आहेत. त्यातच महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांसह मंत्र्यांच्यामागे ईडीची पीडा लागली आहे. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत किरीट सोमय्यांवर निशाणा साधला.

केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर होत आहे आणि हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे. किरीट सोमय्या हे सीबीआयचे मुख्य आहेत का?, रस्त्यावर चलन काटणाऱ्या प्रमाणे ईडीची अवस्था झाली आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.

मी खासदार झाले तरी मला ईडी आणि सीबीआयचे प्रमुख माहीत नव्हते. आज रस्त्यावर चलन काटणाऱ्या प्रमाणे ईडीची अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच सीबीआय आणि ईडीच्या कामाला काही दर्जा आहे की नाही?, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

“शुभमन गिल-वेंकटेश अय्यरची विस्फोटक खेळी; कोलकाताचा आरसीबीवर एकतर्फी विजय”

फडणवीस सरकारच्या काळातील काही मंत्र्यांच्या फाईल बाहेर येणार- नाना पटोले

चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं गोड स्वप्नं; रूपाली चाकणकरांचा टोला

राष्ट्रवादीत जोरदार इन्कमिंग; पेरणे ग्रामपंचायतीच्या सरपंच्यांसह अनेकांच्या हाती घड्याळ